• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपळगाव येथून फरार नवविवाहिता व तिच्या साथीदारांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील तरुणाकडून पैसे घेऊन विवाह केलेली मध्य प्रदेशमधील तरुणी विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्रीतून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फरार नववधू तिच्या तीन साथीदारांना पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर ) येथील चेतन विलास चौधरी (रा. संजय नगर पिंपळगाव (हरेश्वर)) याचा विवाह मध्यप्रदेशातील मोहमांडळी ता. जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथील कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे यांचे सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य रा. सोनवद जि. बडवानी, हापसिंग उर्फ आपसिंग शिकाऱ्या पावरा रा‌. हैद्रयापाडा ता. शिरपूर जि. धुळे व अनिल विश्राम धास्ट रा. मोहमांडळी ता. जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांचे मध्यस्थीने १ लाख २६ हजार रुपये घेऊन दि. ३ मे २०२२ रोजी झाला होता. दरम्यान विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी वधू कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे ही आपल्या शिरपूर येथील साथीदारासोबत रात्री दोन वाजता पसार झाली. याप्रकरणी चेतन चौधरी याने दि. ६ मे रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात खरगोन (मध्यप्रदेश) व शिरपूर (धुळे) येथून नवविवाहितेसह तिच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. माहिती जाणून घेण्यासाठी पाचोरा न्यायालयातून सात दिवसाची पोलिस कोठडी मिळविली आहे. याबात सदर युवती व तीच्या साथीदारांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस नाईक रविंद्रसिंग पाटील, पोलिस काॅन्स्टेबल पंकज सोनवणे, मनोज बडगुजर, महिला पोलिस काॅन्स्टेबल योगिता चौधरी या पथकाची स्थापना केली. या पथक दि. १७ मे रोजी मध्यप्रदेशातील सोनवद ता. सेंधवा जि. बडवानी येथे जावून सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य यास ताब्यात घेऊन मोहमांडळी गाठले. यावेळी कलिता उर्फ लक्ष्मी किसन कोराडे ही घरीच आढळून आल्याने तीस पोलिसी खाक्या दाखविताच तीने रोख १ लाख २६ हजार, १० हजार रुपये असे १ लाख ३२ हजार रोख, व १० हजार रुपये किंमतीचे सोने चांदिचे दागिने काढून दिले. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस पथकाने वधू व तिच्या तीन साथीदारांना दि. १९ मे रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे आणल्यानंतर पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पिंपळगाव (हरेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे प्लास्टिकचा पुनर्वापर उपक्रम

Next Post

पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद सोसायटी चेअरमनपदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपळगाव हरेश्वर येथील गुरुगोविंद सोसायटी चेअरमनपदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon