पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाघुलखेडा येथील शेत शिवारात शॉर्टसर्किट झाल्याने शेतकऱ्याच्या शेतात आग लागली. आगीत बाजरीचे पीक, बाजरीचा चारा आणि ठिबक सिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या आहेत. शेतकऱ्याचे ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आला आहे.
चंद्रकांत बन्सीलाल लाहोटी (वय ५३, रा. यशोदा नगर, पाचोरा) यांनी खबर दिली आहे. त्यांचे वाघुलखेडा येथील शेतात २६ मे रोजी दुपारी ३ वाजेनंतर शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीत जमा केलेल्या ठिंबक सिंचनाच्या नळ्या, प्लास्टिक पाईप, ६० ते ६५ क्विंटल बाजरीचे पीक व सुमारे ७ ट्रॅक्टर बाजरीचा चारा असा सुमारे ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आला आहे. तपास पोना सचिन निकम करीत आहे.