मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – निमखेडी ( ता – मुक्ताईनगर ) येथील शुभम सुभाष टोके यांची डॉक्टरेट शिक्षण व संशोधनासाठी कॅनडा येथे निवड झाली आहे. शुभम निमखेडी येथील माजी सरपंच आणि जिल्हा दूध संघाचे संचालक सुभाष टोके यांचा मुलगा आहे.त्याचे या निवडीबद्दल कौतुक होत आहे.
शुभम यांचे शिक्षण बी.एस.सी. (संगणक) फर्ग्युसन कॉलेज,पुणे येथे व पोस्ट ग्रॅज्युएशन जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट स्टडीजमध्ये झाले आहे. आता CAT द्वारे त्यांची कॅनडा येथे निवड झाली आहे. संशोधनासाठी त्यांचा माहिती प्रणाली हा विषय आहे.संपूर्ण महाविद्यालयातून वेगवेगळ्या विषयांमध्ये फक्त 6 विद्यार्थी निवडले गेलेले आहेत.त्यात माहिती प्रणाली या विषयासाठी शुभम यांची एकमेव निवड झाली आहे.आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीद्वारे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, व्हँकुव्हर, कॅनडा येथे फेलोशिपसह प्रवेश मिळालेला आहे.