भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील समता नगरातील आलोटकर कुटुंबाला डांबून ठेवत हल्ला केल्याचा आरोप असलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
समता नगरातील आशिष आलोटकर या तरुणाला डांबून ठेवून मारहाण व कुटुंबाला ओलिस ठेवण्यात आले होते. या कुटुंबाला धमकावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. खरात टोळीतील चौघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी पप्या साळवे, आकाश खिल्लारे, सुमित घनघाव यांना अटक केल्यानंतर त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीनही संशयीताना ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. प्रमुख संशयित आतीष खरात अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरु आहे.