जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस कार्यालय समोरून एका महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत जिल्हापेठ शुक्रवारी सायंकाळी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमोद पंडित भारंबे (वय-५५) रा.आयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ते दुचाकी (एमएच १९ एझेड १९६०)ने जळगाव शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस टपाल कार्यालयाजवळ दुचाकीने आले होते. त्यावेळी टपाल कार्यालयासमोर दुचाकी पार्किंगला लावून ते कामानिमित्त निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.