जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील श्री गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आंतरजिल्हा व अंतर विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले.
धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा स्पर्धेत देवकर महाविद्यालयाच्या प्रतिभा हेलोडे आणि प्राची राठोड या विद्यार्थिनींनी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.
त्यानंतर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे (जि. पुणे) येथे झालेल्या अंतर विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुलींच्या कबड्डी संघात देवकर महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी योगदान दिले. या विद्यार्थिनींमध्ये कल्पिता संजय देसले, पल्लवी सदाशिवराव वानखेडे, देवयानी गिरीश माळी, कोमल विनोद बिर्हाडे, प्रेरणा सर्जेराव भदाणे, हर्षल योगेश्वर भदाणे यांचा समावेश होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबराव देवकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

