नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावातील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे आसाम येते ड्युटीवर असताना, (ता.23 रोजी) शहीद झाले. त्यामुळे बोराटवाडी परिसरासह इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून आपल्या पदावर कार्यरत होते.गस्त घालत असताना,भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली, यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या संदर्भात शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,मुलगी व भाऊ असा छोटा परिवार आहे.
शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव (शुक्रवार 26 फेब्रुवारी) रोजी बोराटवाडी या त्यांच्या निवासी गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळते.







