जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेस पतीकडून शारीरिक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कॉलनीतील माहेर असलेल्या रूपाली महेश वाघ (वय-३३) यांचा विवाह कुसुंबा ता.जि. धुळे येथील महेश गोरख वाघ यांच्याशी २९ जून २०२० रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती महेश गोरख वाघ याने विवाहितेला किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यानंतर सासू आणि सासरे यांनीदेखील गांजपाठ करण्यास सुरुवात केली. पती. सासू. सासरे यांच्याकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहिता रूपाली वाघ या जळगाव येथील गणेश कॉलनी येथे माहेरी निघून आल्या. त्यांच्या फिर्यादीवरून २३फेब्रुवारी रोजी रात्री पती महेश गोरख वाघ, सासु आशा गोरख वाघ, सासरे गोरख वाघ सर्व रा.कुसुंबा ता. जि.धुळे यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.