• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तान सरकारवर इसीस आणि पाकिस्तानी लष्करचं प्रचंड दडपण आहे – उज्ज्वल निकम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2020
in भारत
0

मुंबई(वृत्तसंस्था)- पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने दाऊद इब्राहिमचे वेगवेगळ्या नावाने बनवलेले अनेक पासपोर्ट, नॅशनल आयडेंटिटी नंबर जाहीर केला. हे काल जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली असणार. त्यामुळेच पाकिस्तानने नकाराची घंटा वाजवली. पाकिस्तान सरकारवर इसीस आणि पाकिस्तानी लष्करचं प्रचंड दडपण आहे. त्याची ही प्रत्यक्ष पावती आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली.

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याची कबूली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल (22 ऑगस्ट) दिली होती. मात्र, अवघ्या 24 तासात पाकिस्तान सरकारने आपल्या वक्तव्याचा घुमजाव केला आहे. याबाबत उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली.

उज्जव निकम म्हणाले, एखाद्या सर्कशीतील जोकरप्रमाणे पाकिस्तान कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहे. पाकिस्तानने याआधीदेखील अनेकवेळा खोटारडापणा केला. ज्यावेळेला पाकिस्तानचे धूर्त माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीला आले होते. त्यावेळेला त्यांनी कोण दाऊद इब्राहिम? आम्ही ओळखत नाही? आमच्या येथे राहत नाही, अशी नाटकी भाषा केली होती.

ज्यावेळी 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ताज हॉटेलमध्ये हल्ला केला होता. त्यावेळीदेखील कसाब आमच्या देशाचा नागरिक नाही, असे पाकिस्तानने जाहीर केले होते. पण पाकिस्तानच्या जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने अजमल कसाब हा फरीदकोटचा असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी पाकिस्तान सरकारला मान्य करावे लागले की, तो त्यांच्या देशाचा नागरिक आहे, असे निकम यांनी सांगितले.

26/11 हल्ल्यानंतर मी आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेलो होतो. तिथे आम्ही आठ दिवस होतो. त्यांना या हल्ल्याचा मास्टमाइंड हाफिज सईद याच्याविरोधात खटला सुरु करा, असे आम्ही सांगितले. तेव्हा ते म्हणाले पुरावे नाहीत. ते म्हणाले तुम्ही पुरावे द्या. मी म्हटलं कट तुमच्या भूमीत रचला गेला. तुम्ही पुरावे शोधा. त्याला त्यांनी अद्यापही उत्तर दिले नाही, असे ते म्हणाले.

त्यानंतर आम्ही भारतात आल्यानंतर 26/11 हल्ल्याच्या प्रमुख सुत्रदारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडली याची साक्ष घेतली. त्याने लष्कर-ए-तोयब्बा, पाकिस्तान आर्मी, इसीस यांच्यातील संबंधाबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे त्याने साक्ष म्हणून डॉक्‍यूमेंटरी दिली, अशी माहिती त्यांनी दिली.

दाऊदला भारतात पाठवलं तर त्यांची बरीच गुपितं बाहेर येतील अशी भीती इसीस, लष्कर ए तोयब्ब, पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तान दाऊदला भारताच्या ताब्यात देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

 

Previous Post

विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

Next Post

कोविशिल्डच्या उत्पादनांबाबत माध्यमातील वृत्त चुकीचे – सीरम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोविशिल्डच्या उत्पादनांबाबत माध्यमातील वृत्त चुकीचे - सीरम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon