चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे . या दोघांकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चोपडा शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमधील संशयीतांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज पाटील परेश महाजन , रवींद्र पाटील, राहुल बैसाणे, दीपक कुमार शिंदे , प्रमोद ठाकूर यांचे पथक रवाना केले होते.
गणेश उर्फ घनश्या शिलदार बारेला (वय २४, रा. कर्जाणा ता.चोपडा) व लखन उर्फ टारझन सुरेश बारेला ( वय 22, रा. अजगिऱ्या ता. वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश ) अशी अटकेतील दोघा संशयीतांची नावे आहेत.
चोपडा तालुक्यातील कर्जांना येथील गणेश बारेला याने दुचाकी चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाले त्यानुसार पथकाने कर्जांना गावातून गणेश याला अटक केले. त्यांनी दिलेला माहितीनुसार त्याचा साथीदार व लखन उर्फ टारझन यालाही पथकाने पकडले. दोघांनी चोपडा शहरात तसेच नाशिक येथे दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून दोघांकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत. पुढील कारवाईसाठी दोघांना चोपडा शहर पोलिसांना सोपविण्यात आले आहे.