पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील बहादरपूर रस्त्यावरील लालबाग भागात राहणारे जितेंद्र पाटील यांच्या पत्नी प्रतिभा पाटील (वय 27) हिने आज पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात आनंद पाटील ( रा – बालाजी मंदीर खालचे गाव ता. शिरपुर जि. धुळे ) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास जितेंद्र पाटील यांनी फोन करुन मयताच्या माहेरी कळविले त्यावेळी त्यांना समजले की प्रतिभा हिस कुटीर रुग्णालय येथे नेले आहे कुटीर रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रतिभा पाटील हिस तपासणी करुन सकाळी 9 वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले आहे , असे याबाबतच्या फिर्यादीत नमूद केले आहे . याबाबत पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.