जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी देखील अल्पवयीन आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. ५ ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान संशयित अल्पवयीन आरोपीने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. दरम्यान, २२ फेब्रुवारीला सकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. पालकांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. तेथे पिडीत गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विधी संघर्ष अल्पवयीन बालक यास ताब्यात घेण्यात आले कारवाई पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे , सचिन मुंडे यांनी केली आहे. विधी संघर्ष अल्पवयीन बालकास बाल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याची बाल सुधारगृहात रवानगी झालेली आहे.