पाचोरा ( प्रतिनिधी) – स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत मोफत अभ्यासिका व स्पर्धा परीक्षांसाठीची संदर्भ ग्रंथ पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे .तसेच माजी आमदार स्व. तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या पत्नी व वैशालीताई पाटील यांच्या मातोश्री कमलताई पाटील यांच्या हस्ते निर्मल जिम्नॅस्टिक क्लबचे उद्घाटन आज करण्यात आले. पाचोरा येथील शिवसेना महिला नेत्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा शहरात व तालुक्यात अनेक कार्यक्रम घेण्यात आले सौ वैशालीताई सूर्यवंशी या स्वर्गीय आर ओ पाटील तात्यासाहेब यांची कन्या असून त्यांच्याकडे कुठलीही पद नसून त्यांनी आपल्या वडिलांची जागा सांभाळून वडिलांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी काम करीत आहे कार्य करीत असून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येकाचा सुखदुःखात हजर राहून सर्वांची नाळ जोडत असून प्रचंड इच्छाशक्ती नातेगोते संभाळून कार्यकर्त्यांची जुळवणूक आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रचंड उत्साह निर्माण झालेला होता हजारोचे संख्येने त्यांचे नातेवाईक शिवसैनिक महिला वर्ग उपस्थित होते त्यांच्या या वाढदिवसानिमित्त निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये निर्मल अभ्यासिका वर्ग याचे आज रोजी उद्घाटन निर्मल स्कूल मध्ये प्रा.राजेंद्र चिंचोले सर यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या पत्नी सौ कमलताई पाटील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सावंत, प्राचार्य गणेश राजपूत सर ,उपप्राचार्य प्रदीप सोनवणे सर तसेच निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.