जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील नांद्रा या गावातील युवकांनी शिवसेनेचे युवा नेतेशिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवा सेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढरी व पाळधी जि. प. गटातील तरुणांनी शिवसेनेत आज सायंकाळी सात वाजता राजगड या निवासस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते नांद्रा येथील अमोल गव्हाळे, सौरव गुजर,हर्षल पाटील, शुभम पाटील, रुपेश पाटील, राहुल पाटील, मनोज बाविस्कर, अनिल बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील यांच्यासह 50 युवकांनी शिवसेनेचे युवा सेनेचे प्रवेश घेतला याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, मीडिया सेल प्रमुख मुकेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.








