जळगाव ( प्रतिनिधी ) – घरगुती गॅसचा काळाबाजार करून अवैधरित्या खासगी वाहनामध्ये भरत असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याजवळून २५ हजार ७०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या जळगाव नाक्यावर मयुरी ट्रेंडर्स या कंपनीच्या गेट समोर संशयित आरोपी इम्रान शेख समद ( वय – ३८ ) रा. रथ चौक, जळगाव हा घरगुती गॅसचा अवैधरित्या खासगी वाहनांमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गॅस सिलेंडर व गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण २५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस नाईक नितीन बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी इम्रान शेख समद ( वय – ३८ ) रा. रथ चौक, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आणि शेख करीत आहे.