• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे निकाल जाहिर

नाशिक विभागातून प्रदीप रामराव भाबड विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2023
in Uncategorized
0

नाशिक (प्रतिनिधी) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी नाशिक विभागातून प्रदीप रामराव भाबड हे विजयी झाले आहेत.

विद्यापीठ अधिसभा व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणुक निकाल जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे कुलगुरु ले. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे. विविध अभ्यासमंडळासाठी उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील सहा महसूल विभागात निवडणूक घेण्यात आली, यामध्ये मुंबई विभागातून डेरे राजेश चंद्रकांत, पुणे विभागातून गायकवाड सायबू लक्ष्मण, नाशिक विभागातून भाबड प्रदीप रामराव, औरंगाबाद विभागातून पवार बाळासाहेब शिवाजी, अमरावती विभागातून उबरहंडे राजेश्वर तुकाराम व नागपूर विभागातून दातारकर अभय निलकंठ हे उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुकीत विद्यापरिषदेसाठी प्राचार्य गटात आयुर्वेद आणि युनानी विद्याशाखेतून कुलकर्णी माणिकराव हणमंतराव बिनविरोध तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतून पाथरीकर अनुपमा व्दारकादास व तत्सम विद्याशाखेतून ठाकूर ज्योती राजेश हे उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून देवकर रविंद्र बळीराम, दंत विद्याशाखेतून जाधव प्रशांत दत्तात्रय, होमिओपॅथी विद्याशाखेतून ठाकरे भालचंद्र रामकृष्ण व तत्सम विद्याशाखेतून गिरी विश्रांती हे उमेदवार विजयी झाले आहे.

विद्यापीठ विद्यापरिषदेकरीता प्राचार्य व अधिष्ठाता यांच्यामधुन प्रत्येक विद्याशाखेमधून प्रत्येकी एक याप्रमाणे वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील प्राचार्य करीता मतदान घेण्यात आले आहे. प्रत्येक अभ्यासमंडळाकरीता सहा विभागप्रमुख याप्रमाणे १८ विविध अभ्यासमंडळाकरीता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी करीता निवडणूक घेण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळकारीता राज्यातील विविध ४२ मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या निवडणूकीत एकूण ५७.८७ टक्के मतदान झाले.

विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राधापक वगळता शिक्षक गटाकरीता मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी एकूण ११७४२ उमेदवारांपैकी ६७९५ मतदारांनी मतदान केले होते. विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या समवेत निवडणुक मतमोजणीच्या कामकाजासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव बबनराव उधाणे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकुलसचिव फुलचंद अग्रवाल आदी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होता.


 

 

Tags: #nashik news #maharashtra
Previous Post

‘टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ डॉ. अनमोल सोनवणे “यूथ आयकॉन” पुरस्काराने सन्मानित

Next Post

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण
1xbet russia

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

June 2, 2026
उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon