• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रक्षा खडसे-चंद्रकांत पाटलांत शाब्दिक बाचाबाची

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2020
in जळगाव
0

भुसावळला सीसीआय केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील सर्वश्रुत असलेले वैर पुन्हा एकदा भर कार्यक्रमात दिसून आले. त्यांच्यात कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा गंभीर प्रकार घडला.

बोदवड येथील सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमासाठी खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, कार्यक्रमाला येण्यास आ. चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते सीसीआय केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आ. पाटील यांना त्याचा राग आल्याचे दिसले. उद्‌घाटन कार्यक्रमास थोडे थांबता आले नाही का? असे म्हणत त्‍यांनी स्‍टेजवरच संताप व्यक्त केला. यावर खासदार खडसे यांनी कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजेची होती. वाट पाहूनच मग कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खासदार रक्षा खडसेंवर पलटवार केला. मला आधी सांगितले असते तर तुम्हीच घेतला असता कार्यक्रम, असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. एकमेकांविरोधात त्‍यांनी अनेकदा निवडणूका लढविल्‍या असून यात खडसे यांनी विजय मिळविला आहे. यावेळी मात्र खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट मिळाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला होता.

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असून खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते. एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही, म्हणून चंद्रकांत पाटील हे नाराज झालेले आहेत. भुसावळला गुरुवारी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांची ही नाराजी अप्रत्यक्षपणे दिसून आली.


 

 

Previous Post

पारोळ्यातील गरजू,गरीब कुटुंबाला अमळनेर युवक काँग्रेसतर्फे फराळ वाटप

Next Post

शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा सोमवारी ‘श्री गणेशा’!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा सोमवारी 'श्री गणेशा'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
1xbet russia

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
1xbet russia

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जिल्हा कारागृहात कैद्याचा पोलिस रक्षकावर हल्ला; कारागृह प्रशासनात खळबळ

June 9, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon