नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – नुकतच चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. महाराष्ट्रासह गुजरातमधीलही अनेक भागांना या वादळाचा तडाखा बसला. चक्रीवादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातचा पाहणी दौरा करीत आहेत. तर त्यांच्या या दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. ‘मोदींना कोट्यवधी मृत्यूंचं सोयरसुतक नाही, गडकरी’ पंतप्रधान मात्र हवेत आहे.’ ‘भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय’, असंही मोठं विधान पटोले यांनी केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत चक्री वाडकलाबाबत भाजपकडून कशा प्रकारे राजकारण केले जात असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हवेत आहेत. पंतप्रधान मोदींना या मृत्यूचं काही सोयरसुतक नाही. वास्तविक पाहता नितीन गडकरींनी पंतप्रधान असायला हवे होते.,’ असं पटोले यांनी म्हंटल आहे.
पटोले यांनी नितीन गडकरी यांच्या बद्दलही माहिती देत म्हणाले आहेत कि, ‘ भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना पदावरून हटवून त्यांच्या ऐवजी नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचे अशी चर्चा सुरू आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. नितीन गडकरी यांच्याविरोधात मी जेव्हा लढलो त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. म्हणून आनंद आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
देशात चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात अनेकजण मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा परिस्थितीतही राजकीय पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केले जात आहे. कुणी टोला लगावत आहे. तर कुणी आरोप करीत आहे. आता मोदींच्या पाहणी दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.