नागपूर (वृत्तसंस्था) – तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटर वॉर चांगलंच रंगल आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर आता त्यांच्यावर रुपाली चाकणकर यांनी अजून एक ट्विट करीत निशाणा साधला आहे. ‘जंगल की शेरनी शिकार करती है…सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !,’ अशा अशब्दात चाकणकर यांनी मिसेस फडणवीस यांना पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावरच शायरी केली आहे. त्यांनी स्वतःला जंगलातील वाघिणीची उपमा दिली असून अमृता फडणवीस यांना सर्कशीतील वाघिणीची उपमा दिलेली आहे. चाकणकर यांच्या शेरेबाजीनंतर आता त्यांना फडणवीस कोणत्या शेरेबाजीतून उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून कधी ठाकरे सरकारवर तर कधी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. अलीकडे मिसेस फडणवीस यांच्याकडून ठाकरे सरकारवर सारखी टीका केली जात आहे. हि टीका शेरोशायरीतून केली जात असल्यामुळे अमृता फडणवीसांच्या शायरीतील टीकेला आता राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चाकणकर यांच्याकडून पलटवार केला आहे.