जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील बीएसएनएन ऑफीस क्वार्टरमध्ये अज्ञात चोरट्याने घरात कोणीही नसतांना अज्ञात चोरट्या महावितरण कंपनीचे विज मीटर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनाली किशोर वानखेडे (वय-२८) रा. बीएसएनएल ऑफीस क्वार्टर जळगाव ह्या BSNL मध्ये नोकरील आहे. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर रोजी कामाला सुटी असल्याने खासगी कामासाठी त्या यावल येथे गावाला गेल्या. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घरी आल्यावर घरात लाईट नसल्याने फ्यूज गेला असेल म्हणून मीटरजवळ पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीचे मीटर अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजीव नारखेडे करीत आहे.







