जळगाव (प्रतिनिधी) – आज शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात १३२ आढळली असुन दिवसभरात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१८२९ झाली आहे. त्यापैकी ४८५७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०१८ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या २१८ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९३.७२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३९ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ४७, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ३२, अमळनेर १, चोपडा ६,पाचोरा १ , भडगाव १, धरणगाव २, यावल ६, एरंडोल ००, जामनेर १८, रावेर ६, पारोळा ००, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ आहे. २०१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.







