• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा येथे आत्मदहन करण्यापूर्वीच भारती कोकने पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पती विनोद कोकणे यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी आणि तपासाची मागणी करणाऱ्या त्यांची पत्नी भारती कोकने यांना आज त्यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्शवभूमीवर त्या पाचोऱ्यात येताच पोलिसांनी ताब्यात घेतले.

बांबरुड (राणीचे) येथील विनोद कोकने यांचा वरखेडी रोडवरील क्वाॅरटांईन सेंटर मध्ये २० जुलैरोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला होता. विनोद कोकने यांनी आत्महत्या केली नसुन त्यांचा घातपात झाला आहे. असा आरोप त्याची पत्नी भारती कोकने यांनी दि. १५ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. पाच महिन्यांपासून न्याय मिळत नसल्याने भारती कोकने यांनी दि. १७ रोजी सकाळी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच वर्षाची मुलगी व दोन वर्षाच्या मुलासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाचोरा पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅण्ड व भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात तैनात करण्यात आले होते. अखेर भारती कोकने, दोन मुले व आई भडगाव कडुन रिक्शात येत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, काॅ किशोर पाटील, सुनिल पाटील, किरण पाटील, निलेश गायकवाड व महिला पोलिस कर्मचारी शारदा भावसार यांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.

विनोद कोकने दि. १९ जुलै रोजी कोरोनाची लक्षणे आढळुन आल्याने तो स्वत:हुन चाचणी करुन घेण्यासाठी वरखेडी रोडवरील साईमोक्ष मंगल कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल झाला होता. विनोद याचे स्वॅब घेण्यात आले. कोरोनाचा अहवाल येण्याअगोदरच दि. २० जुलैरोजी पहाटे विनोद कोकने याचा मृतदेह कोविड सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चॅनलगेटला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता.

भारती कोकने यांनी पतीने कोरोना व्हायरसचा उपचार हा खाजगी रुग्णालयात करण्यासाठी माझ्या चाळीसगाव येथील माहेरहुन ४० हजार रुपये आणले होते. ते पैसे माझे पती विनोद कोकने यांच्याकडे होते. मात्र मृतदेहाजवळ सदरचे ४० हजार रुपये आढळून न आल्याने त्यांची आत्महत्या नसुन पैशांसाठी हत्या झालेली असतांना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. असा आरोप केला आहे.

भारती कोकने हिने दोन लहान मुलांसह आज आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांना सकाळ पासुनच कसरत करावी लागली. भारती कोकने चाळीसगावहुन बसने येणार असल्याचे सांगितले होते . पोलिस महाराणा प्रताप चौक, बस स्टॅण्ड येथे उभे राहुन चाळीसगाव कडुन येणारी प्रत्येक बस तपासत होते. मात्र भारती, एक मुलगा, एक मुलगी व आई हे महाराणा प्रताप चौकाच्या अगोदर देवी मंदिराजवळ उतरुन तेथुन रिक्षाने येत होत्या

दरम्यान पोलिसांकडे फोटो असल्याने पोलिस बससोबतच भडगाव कडुन येणारी प्रत्येक रिक्षा तपासणी करत होते. त्या रिक्षात आढळुन आल्याने पोलिसांनी रिक्षातुन उतरवुन शासकीय वाहनातुन पोलिस ठाण्यात आणले. त्यांचे जवळील एक राॅकेलची बाटली व आत्मदहनाचा उल्लेख असलेले बॅनर पोलिसांनी जप्त केले. चौकशी करुन कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगुन भारती कोकने, दोन मुले व आई यांना शासकीय वाहनातुन त्यांचे घरी सोडण्यात आले.

भारती कोकने आत्मदहन करणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजेपासून पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार हंसराज मोरे, राहुल बेहरे, गजानन काळे, नंदकुमार जगताप, ज्योती बोरसे, यांचेसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड सकाळी ९ वाजेपासूनच तैनात होते.


 

 

Previous Post

रावेरात जीटीएल पाठोपाठ इंडीसचेही होणार ३४ टॉवर सील

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; तर ३३ रुग्ण बरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; तर ३३ रुग्ण बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon