जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने आज शनिवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत सहा पोलीस पथक रस्त्यावर उतरले असून शहरातील मुख्य चौकाचौकात वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात शहरातील पाच पोलीस ठाण्यात अनेक गुन्हा दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये आज शनिवार १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपासून अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाती प्रत्येक भागात जावून चौकात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली आहे. यात वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर वाहन सोडले जात होते. तर कागदपत्रे नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक मुंढे यांनी दिले आहे.
शहरातील कांचन नगर, तांबापूरा, गेंदालाल मिली, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको, शनीपेठ परिसर, मास्टर कॉलनी, सुप्रिम कॉलनी यासह आदी भागात ही कारवाई केली आहे. सकाळी ६ वाजेपासून नेमलेल्या ६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद भागात जावून वाहनांच तपासणी केली. आज सकाळी ६ पथक तयार आहे, यात १० अधिकारी असून १२५ कर्मचारी याचा समावेश आहे, प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात असून संशयास्पद वाहनाधारकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.