गुढे.ता.भडगांव (वार्ताहर) – गुढे गांवासह परिसरातील सावदे,दलवाडे गिरणा नदी पात्रातून सरास टायरच्या बैलगाडाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात दिवसारांंत्री अवैध वाळूचा उपसा होत असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून येथील वाळू चोरी थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील गिरणा नदी पात्रातून दिवसरात्र गुढे येथील ३० व जुवाडी येथील ३५ टायर बैलगाडीधारक व कोळगाव येथील ८ व गोंंडगांव ७ असे नेहमीचे टायर बैलगाडीधारक दररोज सावदे,दलवाडे येथून बैलगाडीने मोठ्या प्रमाणात गिरणा नदी पात्रातून विना परवानगी वाळूची चोरी केली जात आहे गुढे,जुवाडी,कोळगाव,गोंडगांव, येथील काही बैलगाडधारक आमचे घर बांधकाम करायचे आहे अशी खोटे नांवे सांगून सरास ही वाळू गांव परिसरात होत असलेल्या छोट्या मोठ्या कामावर विकत आहेत.हेच बैलगाडीधारक गेल्या १०वर्षांपासून वाळू चोरीचा व्यवसाय करून ती विकत आहेत.येथील नदीपात्रातून वाळू घेण्यासाठी गांवातून जावे यावे लागते म्हणून बैलगाडींंचा आवाज व ग्रामस्थांना चोरीची चाहूल व त्रास होतो म्हणून आता वाळू चोरट्यांनी रस्त्याने व गावातून गाडीबैलचा आवाज येऊ नये म्हणून यांनी टायरच्या बैलगाड्या तयार केल्या आहेत.येथील २०ते२५बैलगाडी धारक वर्षभर फक्त वाळू चोरीचा व्यवसाय करतात या लोंकांनी टायरच्या गाडी बनवले आहेत.येथील काही बैलगाडीधारक गुढे फाट्यावर वाळू टाकतात तेथून जुवाडीवाले उचलून जुवाडीला नेतात काही जण घरबांधणीसाठी तर काहीजण पाचशे रुपये प्रमाण विकतात.जुवाडी येथून काहीजण टँक्टरने पोहरे,कळमडू,दहिवद,तरवाडे परिसरात चोरीच्या वाळू विक्रीचा मोठा तेजीचा व्यवसाय करत आहेत यासाठी कोणा, कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून ��








