जळगाव (प्रतिनिधी) – पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार जळगाव जिल्हा शिवसेना,तालुका,विधानसभा क्षेत्र प्रमुख,व शिवसेना पदाधिकारी यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी घर तेथे शिवसैनिक,गाव व वा तेथे शाखा जुन्या शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेऊन नव्या शिवसैनिकांना सोबत घेऊन संघटना वाढवायची आहे. संघटनेच्या वतीने सरकार करीत असलेली लोककल्याणकारी कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शिवसैनिकाची आहे. हे शिवसंपर्क अभिमानाचे उदिष्ट असून जिल्हा प्रमुख डाॅ. हर्षल माने यांनी एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव या तीन विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियान राबविण्याची जोरात मोहीम सुरू केली आहे.
हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सांवत,जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसंपर्क आभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. एरंडोल , पारोळा, चाळीसगाव तालुक्यात जिल्हा प्रमुख डाॅ. हर्षल माने यांनी परिसरात गाव तिथे शाखा हा संकल्प हाती घेतला आहे. यासंदर्भात काल एरंडोल येथे शिवसंपर्क अभियानचा फॉर्म तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांना सुपूर्द करतांना जिल्हा शिवसेना प्रमुख डाॅ .हर्षल माने, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपतालुका प्रमुख रवि चौधरी, संजय पाटील, विभाग प्रमुख छोटू मराठे, राजेंद्र पाटील,प्रमोद राठोड आदी उपस्थित होते.