मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा परिसरात असणार्या गावठी दारू भट्टीवर धाड टाकून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील कुर्हा – काकोडा जवळ असणार्या लालगोटा परिसरात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस पथकाने येथे छापा टाकला. पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. कुर्हा येथील पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार सादिक पटवे, सागर सावे, राहुल नावकर, गोपीचंद सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन एकूण ११ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलिसांनी या छाप्यामध्ये दारू तयार करण्याचे साहित्य व कच्चे, पक्के रसायन नष्ट करून संशयित बिरू शिलदार पावरा (वय ३६, पावरी वाडा, धुळे) याला ताब्यात घेतले. तपास पोलिस नाईक हरीश गवळी करत आहे.