bhuभुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील गोपाळ नगरात शिक्षकाचे बंद घर फोडून ६० हजार ९०० रुपयांचे दागिने चोरल्याची घटनासमोर आली भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
राजेंद्र अशोक कोल्हे (वय-४६) हे गोपाळ नगर येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे, ते शिक्षक आहेत . १३ जुलै रोजी सायंकाळी त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून दागिने आणि सोन्याचे तार असा ६० हजार ९०० किमतीचा माल चोरून नेला सायंकाळी राजेंद्र कोल्हे घरी आले असता हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ संजय सोनवणे करीत आहेत.