गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – गुढे परिसरात केळी पिकांवर कुंकुबर मोझाईक व्हाँयरस (सीव्हीएम) या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने शेतकऱ्यांनी रोगग्रस्त केळी पिक उपटून फेकले आहे. या केळीचा रितसर पंचनामे झाले असून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी भाऊसाहेब पाटील (गुढे),समाधान पाटील (पिप्रीहाट) रवींद्र पवार(दलवाडे)चेतन पाटील (पथराड),रमेश पाटील(कोळगाव) यांनी केली आहे.
गुढे गावासह परिसरातील पिप्रींंहाट,पथराड,कोळगाव ,सावदे,दलवाडे,घुसडी,बात्सर, पिचडे,वडजी,खेडगांव,शिंदी,नावरे,गोंडगांव,घुसडी बोरनार,बोदडे आदी गावातील केळी पिंकावर ककुंबर मोझाईक व्हायरसचा मोठा प्रादुर्भावमुळे केळी पिंक उध्वस्त झाले आहे.एकटया पिप्रीहाट येथे एक लाख केळी खोडे,रोप उपटून फेकण्याची वाईट वेळ आली आहे यामुळे केळी उत्पादक शेेतकरी उध्वस्त झाला आहे.हा रोग सततच्या पाऊस व सुर्यप्रकाशाचा अभावानेच निर्माण झाला आहे.पूर्वी हा रोग केळी रोपांवरच दिसून येत होता आता त्यांचा मोठा प्रादुर्भाव ,प्रभाव वाढल्याने केळी खोडावर देखील दिसून येत असल्याने केळी पिकतज्ञांनी आता खोड देखील उपटून फेका असे सांगितले आहे म्हणून शेतकऱ्यांनी रोपांबरोबर खोड देेखील उपटवून फेेेकले असून या रोगांचा प्रादुर्भाव जिल्हाभरात दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कृृषी व महसूल विभागास पंचनामे करण्याचेे आदेश दिल्यानेे या आदेशानुसार परिसरात रितसर पंचनामे करण्यात आलेत शेेतकऱ्यांना एक एकर केळी लावण्यासाठी कमीतकमी दहा हजार रुपये खर्च येेतो हा तर लागवड खर्चच आहे नुकसान भरपाई दिली तर ती लाखावर जाते म्हणून शासनाने किमान हेेक्टरी पन्नास हजार रूपये तरी देण्यात यावे अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील आमदारांनी शासन दरबारी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून या शेतकऱ्यांना न्याय व दिलासा दयावा अशी मागणी शेेतकऱ्यांनी केली आहे.