जळगाव (विशेष प्रतिनिधी) – अँग्लो उर्दू हायस्कुल संस्थेतर्फे डॉ.प्रदीप तळवेलकर,प्रवीण पाटील व डॉ.रणजित पाटील यांचा सत्कार सोहळा दि.12 रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता एम. ए. आर. अँग्लो उर्दू हायस्कूल , जळगाव येथे पार पडला.
महाराष्ट्र राज्य युवा शारिरिक शिक्षक महासंघाच्या संचालक पदी प्रा. डॉ. रणजित पाटील यांची तर महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघ कोअर कमेटी सदस्यपदी डॉ.प्रदिप तळवेलकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच प्रवीण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे अँग्लो उर्दू हायस्कुल संस्थेचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हस्ते व प्राचार्य डॉ.बाबू शेख यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सल्लागार प्रा. हाजी इकबाल मिर्झा तसेच प्राचार्य व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.








