• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव कारागृह अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा कारागृहात शुक्रवारी 11 सप्टेबर रोजी संशयीत आरोपी रविंद्र उर्फ चिन्या जगताप याचा संशयास्पद मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांची एकुणच भूमिका संशयास्पद असुन त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना अहवाल देण्यास उशिर केला. आता न्यायालयीन चौकशी होणार असल्याने त्यातून काय सत्य बाहेर येते त्यावर लक्ष लागून आहे.

शहर पोलीस स्थानकात दाखल हाणामारीच्या गुन्ह्यामध्ये रविंद्र जगतापसह इतरांवर गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यात रविंद्र उर्फ चिन्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. शुक्रवारी 11 रोजी चिन्याला अचानकपणे सामान्य रुग्णालय असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत करागृह प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली. चिन्याच्या कुटुंबियांनादेखील माहिती दिली नाही. तसेच चिन्याच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती देखील द्यायला कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड तयार नाहीत त्यामुळे कारागृह प्रशासनाची चुप्पी नेमके काय दर्शविते हे सर्वच संशयास्पद आहे.

चिन्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसर्‍यादिवशी शनिवार पर्यंत देखील जिल्हाधिकारी आणि कारागृह महानिरीक्षक यांना चिन्याच्या मृत्यूबाबत कुठलाही अहवाल गेला नसल्याची माहिती मिळाली. कारागृह अधिक्षकांनी अहवाल वेळीच देण्याचे का टाळले? तसेच कुटुंबियांना देखील माहिती का दिली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी तसेच कारागृह उपमहानिरीक्षक यांना अधिक्षक पेट्रस गायकवाड यांनी फक्त एक पानाचा अहवाल दिला असुन त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही. तसेच कारागृहातून चिन्या जगतापला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय? याबाबत कुठलीही माहिती अहवालात दिलेली नाही त्यामुळे कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांच्या भूमिकेबाबत अधिकच संशय वाढला आहे.

कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहे. त्यामुळे चिन्याच्या बाबत करागृहात नेमके काय घडले हे सांगता येणे कठिण आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी कैदी व कर्मचारी यांच्या समक्ष चिन्याला बेदम मारहाण झाली असावी असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याला पुरेसा वाव आहे. कारण चिन्याच्या मृत्यूला 24 तास उलटण्याच्या आधिच कारागृहातील तब्बल 20 कैद्यांना जालना, औरंगाबाद येथे हलविण्याबाबत कागदपत्र तयार केले जाते व कारागृह प्रशासन तातडीने त्यांना जळगावातून दुसर्‍या जिल्ह्यातील कारागृहात हलविते. हे सर्व कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणा व कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार या कैद्यांच्यासमोर चिन्याला कारागृह अधिक्षकांसह तीघा कर्मचार्‍यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेविषयी कोणाकडेच काही सांगायचे नाही, असा दम देखील कारागृह अधिक्षकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना भरल्याचे समजले आहे. याबाबत निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षीत आहे.

गेल्या दिड महिन्यांपासून पेट्रस गायकवाड हे कारागृह अधिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या कामकाजा विषयी त्यांनी आतापर्यंत कुठल्याच माध्यमांशी संवाद साधलेला नाही. तसेच त्यांचे कर्मचारी देखील कुठलेही कारण सांगुन कारागृह अधिक्षकांना भेटू देत नसल्याचे समजते.

दरम्यान कारागृहात आता 295 पुरुष व 15 महिला असे 310 कैदी आहेत. मागील शनिवारी 5 सप्टेबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या भेटीवेळी एकुण 442 कैदी कारागृहात होते. पुढील आठ दिवसातच आज 132 कैदी कमी होवून 310 संख्या झाली आहे. यापैकी 40 कैदी जालना येथे तर औरंगाबाद येथे 10 कैदी हलविल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कारागृहातील ताण काहीसा हलका झाला आहे.

बेफाम वागणुकीला जबाबदार कोण?
चिन्याचे शवविच्छेदन न्यायमुर्ती डी.बी. साठे यांच्या समक्ष इनकॅमेरा झाले. आता हे प्रकरण न्यायालय चौकशीमध्ये गेले आहे. या चौकशीमधून काय सत्य बाहेर येते. हे लवकरच दिसुन येईल. मात्र कारागृह अधिक्षक आणि त्यांच्या बेफाम वागणार्‍या कर्मचार्‍यांच्या वागणुकीला कोण लगाम घालेल? हा खरा प्रश्न आहे.


 

 

Previous Post

कांताई बंधार्‍यात बुडालेला तरुण अद्यापही बेपत्ताच

Next Post

उद्यापासून आरोग्य सर्वेक्षणाला होणार सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उद्यापासून आरोग्य सर्वेक्षणाला होणार सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon