जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील धानोरा गावानजीक असलेल्या कांताई बंधार्यात राजेश प्रकाश चव्हाण (20) रा. धानवड ता. जि. जळगाव या तरुणाचा सेल्फी काढत असतांना पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. मात्र याप्रकरणी मनपाचे आपत्कालीन पथक व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी आज रविवार रोजी शोधकार्य मोहीम राबविली असता सुमारे साडेसहा तास कांताई बंधार्यात शोध घेतले असता तो अद्यापही मिळून आला नाही. याबाबत गिरणा काठावरील गावातील पोलीस पाटील व सरपंचांना पोलीसांच्या माध्यमातून सुचना देण्यात आल्या आहे. सदर बेवारस मृतदेह आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
दरम्यान गिरणा नदीच्या बंधार्याच्या वाहत्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने बुडालेल्या तरुणाला शोधण्यासाठी मनपाचे आपत्कालीस शोधपथक व पट्टीच्या पोहणार्यांना पाचारण केले असता त्यांना मृतदेह शोधण्यास अडचण येत आहे. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुमारे साडेसहा तास शोधकार्य सुरु होते. यावेळीस तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पो.काँ. उमेश भांडारकर, पो.ना. संजय भालेराव, अनिल मोरे हे उपस्थित होते.
अशी घडली घटना
दरम्यान राजेश व त्याचा एक मित्र असे दोघे रा. धानवड हे शनिवारी सायंकाळी कांताई बंधार्याजवळ गेले होते. तेथे फोटो काढत असताना राजेशचा पाय घसरून बंधार्यात पडला. सोबतच्या मित्राने आरडाओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
अंधार असल्यामुळे राजेशचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. रविवारी सकाळी दहा वाजेपासून शोधकार्य सुरु झाले तर सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरु असतांना राजेश हा मिळून आला नसल्याने धानारे व माहाडी पोलीस पाटलांना सुचना देण्यात आल्या आहे. सदर घटना स्थळी लक्ष ठेवून माहिती पोलीस स्टेशनला कळवणे.