जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरात नगरपरिषदेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाभियानअंतर्गत बांधलेल्या ६८ कोटींची भूमिगत गटार योजनेचे लोकार्पण माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले .
जामनेर शहरासाठी वरदान ठरणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत भुयारी गटार व सांडपाणी आणि प्रक्रिया योजनेचा लोकार्पण सोहळा झाला
यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन , मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील , गटनेते डॉ प्रशांत भोंडे, सचिव जितेंद्र पाटील, नाना बाविस्कर यांच्यासह सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते आमदार गिरीश महाजन म्हणाले की, गावातील सर्व सांडपाणी नदीत यायचे हेच पाणी विहिरीत पसरून दुर्गांधी व रोगराई पसरत होती त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्ऩ निर्माण झाला होता म्हणून ही योजना मंजूर केली जवळपास 66.54 कोटी रुपये खर्चाची ही योजना आज पूर्णत्वास आली आहे पिकांना उपयुक्त पाणी मिळणार आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, श्रीराम महाजन , अतिश झाल्टे , बाबुराव हिवराळे, संध्या पाटील, शितल सोनवणे, नवल पाटील, लीना पाटील , किरण पोळ , ज्योती पाटील , जयेश पाटील , सुहास पाटील , उल्हास पाटील, कैलास नरवाडे , तालुका उपाध्यक्ष दिपक महाजन , तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे , उपमुख्यअधिकारी दुर्गेश सोनवणे , बांधकाम अभियंता आर डी सूर्यवंशी, भैय्या पाटील, श्रीकांत भोसले आदी पदाधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते .