• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2026
in Uncategorized
0
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

भावेश पोपट पाटील याला न्यायालयाचा प्रोबेशनचा लाभ; जखमीला १५ हजार रुपये नुकसानभरपाईचे आदेश

जळगाव,  : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथे डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी भावेश पोपट पाटील याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ अन्वये दोषी ठरविले. मात्र त्याचे वय, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे आणि सुधारण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट, १९५८ च्या कलम ४ अंतर्गत लाभ देण्यात आला. पुराव्याअभावी सहआरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मारहाण करून चाकूने वार

१६ डिसेंबर २०२१ रोजी खेडी बुद्रुक येथे धनराज गजानन कोळी यांच्यावर मारहाण करून चाकूने वार करण्यात आले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली.

१४ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या

खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. जखमी साक्षीदाराची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि जप्त करण्यात आलेले हत्यार या महत्त्वपूर्ण पुराव्यांच्या आधारे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी. बी. चौधरी आणि ॲड. एन. डी. चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या पुराव्यांच्या आधारे भावेश पाटील याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले.

न्यायालयाने भावेश पाटील याला तीन वर्षे चांगल्या वर्तनाच्या अटीवर ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेवढ्याच रकमेचा जामीनदार देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कालावधीत कोणताही गुन्हा करू नये किंवा शांतता भंग करू नये, अशी अट घालण्यात आली आहे.

न्यायालयाने जखमी धनराज कोळी यांना १५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले असून, आणखी १५ हजार रुपये कार्यवाहीचा खर्च भरण्याचे आदेश भावेश पाटील याला देण्यात आले आहेत.
भावेश पाटील याच्या वर्तनावर जिल्हा परिविक्षा अधिकारी, जळगाव लक्ष ठेवणार आहेत.दरम्यान, या गुन्ह्यातील सहआरोपी संदीप पोपट पाटील, शिवाजी कडूबा पाटील यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दोष सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

Previous Post

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Next Post

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!