• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत राबवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. तसे संकेतच भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी दिल्याने शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

आशिष शेलार यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच बिहार पॅटर्न आता मुंबई महापालिकेत राबवण्याचे संकेतही दिले. शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. महाराष्ट्रातील या आघाडीचे पडसाद बिहारमध्ये उमटले. बिहारी जनतेला काँग्रेसेने शिवसेनेला सोबत घेणं आवडलं नाही. त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये सपाटून मार खावा लागला. तेच आता मुंबईत घडेल. मुंबईकर मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची साथ सोडेल, असा दावा शेलार यांनी केला आहे. तुम्ही महापालिका निवडणुकीतही काँग्रेससोबत राहा. जनता तुमचा निश्चित पराभव करेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महापालिका निवडणूक मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वातच लढवू. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणूक कामाला लागलो असून फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मुंबई महापालिकेसाठीची रणनीती आजच सांगणार नाही, असं सांगून शेलार यांनी मुंबईत परिवर्तन होणार असल्याचेच संकेत दिले आहेत.

शेलार यांनी बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत लागू करण्याचे संकेत दिले आहेत. या बिहार पॅटर्ननुसार प्रचाराची धुरा फडणवीस यांच्याकडेच राहील. त्यासाठी निवडणुकीची खास रणनीती बनवण्यात येईल. बुथ लेव्हलपर्यंतची ही रणनीती राहणार आहे. विकासाची मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश आदी मुद्दे जोरकसपणे मांडण्यावर भाजपचा भर राहणार आहे. बिहार निवडणुकीतही फडणवीस यांनी हीच रणनीती वापरली होती. तिच रणनीती मुंबई महापालिकेत वापरली जाणार आहे. फडणवीस यांनी बिहार निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता. चौकसभांचा धडाका लावला होता. तोच पॅटर्न मुंबईत राबवला जाणार असल्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत. भाजपमध्ये अनेक नेते जनतेवर थेट प्रभाव पाडू शकणारे आहेत. दुसरीकडे शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता इतर नेत्यांमध्ये मतदारांवर पाहिजे तितका प्रभाव पाडू शकत नाहीत. मात्र, शिवसेनेचं संघटन ग्रासरुटपर्यंत मजबूत असल्याने शिवसेनेच्या किल्ल्यांना भाजप कितपत खिंडार पाडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


 

 

Previous Post

रिक्षा उलटल्याने चिमूरड्याचा मृत्यू

Next Post

मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन – चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक
1xbet russia

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा
1xbet russia

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
1xbet russia

चोपडा तालुक्यात तरुणीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

June 14, 2026
भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला
1xbet russia

भडगावात जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

जळगावात गोल्ड लोन सोडवून दागिने देण्याचे आमिष; सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक

June 14, 2026
पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

पाचोरा तालुक्यात बनावट पार्सलच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon