जळगाव ( प्रतिनिधी ) – निमखेडी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात १५ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जून रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी घरी असतांना अर्जून इश्वर सपके ( रा. जैनाबाद जळगाव ) याने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी तिचा शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अर्जून सपके यानेच मुलीला फूस लवून पळवून नेले आहे अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी दिली आहे. १० जून रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अर्जून सपके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत .