नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- 18 वर्षांचा एक तरूण हलका होत असताना व्हिडीओ पाहात होता. त्याला अचानक गुप्तांगाच्या इथे जळजळ व्हायला लागली. घाबराघुबरा झालेला हा तरूण पटकन उठला आणि त्यानंतर त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्यावर बेशुद्ध होण्याची वेळ आली होती. शौचास गेल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन हाताळायची सवय असते. काही जण व्हॉटसअॅपचे मेसेज पाहतात तर काही जण व्हिडीओ पाहतात.

टॉयलेटमध्ये मोबाईलच्या नशेत धुंद असणार्या थायलंड येथील नोंनथांबुरी परीसरातील रहिवासी शिराफोफ मासुकर हा आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतांना आपल्या शरीराची हालचालवर लक्ष न ठेवता त्याला जेव्हा लक्षात आले की, गुप्तांगाच्या इथे जळजळ का होते आहे हे पाहण्यासाठी जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला रक्त पडलेलं दिसलं. आपल्या गुप्तांगाला इजा झाली असून त्यामुळेच हे रक्त गळत असल्याचं त्याला कळालं. त्याने नीट पाहिल्यानंतर त्याला दिसलं की त्याच्या गुप्तांगाचा एका अजगराने चावा घेतला आहे. अजगराने त्याच्या मांडीला वेढा घातला होता आणि तो जोरात चावला होता. भेदरलेला शिराफोफने सापाला झटकला आणि आहे त्याच अवस्थेत बाथरूमच्या बाहेर पळ काढला.
मुलगा असा का ओरडतोय; महिलेने टॉयलेटमध्ये फ्लश ओढलं
आपला मुलगा असा का ओरडतोय हे पाहण्यासाठी आलेल्या शिराफोफची आईलाही धक्का बसला. तिने तातडीने आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला आणि मुलाला बांग याई रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी शिराफोफवर उपचार केले असून त्याला टाकेही घालावे लागले आहेत. त्याला चावल्यानंतर अजगर पुन्हा टॉयलेटच्या भांड्याला विळखा घालून बसला होता. प्राणीमित्रांना बोलावून त्याला पकडण्यात आला. या अजगराची लांबी 4 फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजगर विनविषारी असल्याने शिराफोफला फार त्रास झाला नाही. अन्यथा सर्पदंश त्याच्या जीवावर बेतू शकला असता. हा अजगर शौचालयात कसा आला हे अजून कळू शकलेलं नाही. प्राणीमित्रांनी या अजगराला जंगलात सोडून दिलं आहे.







