• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानमध्ये काल रात्री अचानक वीज गेल्याने अख्या देशात अंधार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in भारत, विश्व
0

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तानमध्ये काल रात्री अचानक वीज गेल्याने अख्या देशात अंधार झाल्याचे पाहायला मिळाले आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये पॉवर सिस्टम फेल झाल्यामुळे पाकिस्तानात बत्ती गुल झाली होती. पाकिस्तानमधील कोणतेही असे शहर नाही किंवा चौक नाही, जिथे वीज असल्याचे पाहायला मिळाले नाही. दरम्यान, वीज गेल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतरही अनेक भागांत अद्याप वीज परत आलेली नाही.

संपूर्ण पाकिस्तानात वीज गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे जगभरात पसरले, त्यानंतर ट्‌विटरवर #blackout हॅशटॅग ट्रेंड करु लागला. कोणी या घटनेला भारतीय वायू सेनेने केलेला हल्ला म्हणत होतं तर कोणी याला सायबर अटॅक म्हणत होते. यादरम्यान पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवरही पॉवर ब्लॅकआउटचं वृत्त प्रसारित होऊ लागलं. असं सांगण्यात येत आहे की, पाकिस्तानमधील सर्वच मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच, कराची, इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, रावलपिंडी याठिकाणीही पॉवर ब्लॅकआउट झालं आहे. यासर्व गोंधळादरम्यान, पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्र्यांनी ट्‌विटरवर एक ट्‌वीट केलं आहे.

ऊर्जा मंत्र्यांनी ट्‌वीटमध्ये म्हटले की, ‘रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी पॉवर ट्रान्समिशन सिस्टमची फ्रिक्वेंसी अचानक 50 ते 0 ने खाली आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशात ब्लॅकआऊट झाले आहे. यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा.’

पाकिस्तानचे सूचना मंत्री शिबली फराज यांनीही पॉवर ब्लॅकआउट बाबत आपले वृत्त प्रसारित केले आहे. ते म्हणाले की, एनटीडीसीच्या सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सिस्टिम रिस्टोअर करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर काही वेळाने ऊर्जा मंत्रालयाच्या ट्‌विटर अकाउंटवरुन नॅशनल पॉवर कंट्रोल सेंटरमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु असून ऊर्जामंत्री त्याची पाहणी करतानाचा एक फोटोही शेअर करण्यात आला. त्यानंतर जवळपास 1.45 वाजता एनटीडीसीच्या संगजनी आणि मर्दन ग्रिडमध्ये वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर शाही बाग ग्रिड आणि बहरिया टाउनमध्येही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सकाळी इस्लामाबाद इलेक्‍ट्रिक सप्लाई कंपनीच्या ग्रीडची वीज सुरु करण्यात आली. दरम्यान, पॉवर ब्लॅकआऊटला अनेक तास उलटल्यानंतरही जवळपास अर्ध्या पाकिस्तानात वीज अद्यापही गायब आहे. पाकिस्तानात वीज गायब होण्याची गोष्टी काही नवी नाही. याआधी 2018मध्ये दोनवेळा पाकिस्तानात पॉवर ब्लॅकआऊट झाला होता. 2015मध्ये जेव्हा बलूच आंदोलकांनी पॉवर ग्रीडवर हल्ला केला होता, त्यावेळीही पाकिस्तानमध्ये पॉवर ब्लॅकआऊट झाला होता.


 

 

Previous Post

दिल्ली आंदोलनात पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या !

Next Post

राज्यातील गाडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा – आमदार पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातील गाडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा - आमदार पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon