जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भागचंद जयसिंग परदेशी ( वय – ३२ ) रा. हनुमान मंदिर, पारस मेडिकल समोर, आयोध्या नगर जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांचा राहायला आहे. नोकरीसाठी त्याच्याकडे दुचाकी (एमएच १९ डीई ४९६६) आहे. सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो कामाच्या निमित्ताने दुचाकीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आला. त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेरीस जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक रुस्तम तडवी करीत आहे.