पारोळा (प्रतिनिधी) – सन -1967 मध्ये मरण पावलेले इसमास जिवंत दाखवून सन – 2019 मध्ये रजिस्टर खरेदी खत दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार पारोळा येथील नेरपाट येथे उघडकीस आला आहे.
नेरपाट, ता. पारोळा सुनील ब्रिजलाल पवार वय 60 वर्ष यांचे आजोबा स्व. रामदास पवार क्षेत्रीय रा नेरपाट यांनी त्यांची मौजे नेरपाट शिवारातील शेत गट 63 मधील जमीन जुग ने कसण्यासाठी आरोपी दत्तू दगडू पाटील यांचे आजोबा उत्तम अवचित पाटील यांना दिली होती. दरम्यान रामदास पवार क्षेत्रीय हे सण 1967 मध्ये मरण पावले असता ते जिवंत आहेत असे दाखवून दुसरा इसम उभा करून बनावट कागदपत्र बनवुन त्यांची जमीन आरोपी दत्तू दगडू पाटील यांनी आरोपी साक्षदार प्रदीप सुभाष पाटील,संदीप उर्फ संतोष मुरलीधर पाटील व इतर दोन यांनी संगनमत करून दत्तू दगडू पाटील रा रत्नापिंप्री ता पारोळा यांनी स्वतः चे नावावर खरेदी करून घेतले होते.
नमूद सर्व माहिती सुनील पवार यांनी गोळा करून पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेने नमूद तिन्ही आरोपींना अटक करून मा न्यायालय अमळनेर येथे हजर केले असता दि 3/6/2022पर्यंत तिन्ही आरोपींचा PCR मिळालेला आहे.
सदर गुन्हयात सहकार्य करणारे आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना सुनील वानखेडे करीत आहेत.