नाशिकरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी) :- ‘झुमका वाली पोरं अहिराणी भाषेतील खान्देशी गाण्याने यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रियता मिळविणाऱ्या अभिनेता संशयित विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत विरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यु-ट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करत पीडितेसोबत ओळख वाढवून संशयित सचिन याने ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखविले. मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सातपूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारा संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत याचे शूटिंगदरम्यान पीडितेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले.
कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीला घेऊन जात शारीरिक अत्याचार केले. तसेच पीडित युवतीने पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित कुमावतविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.