जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्हा परिषद वित्त विभागाने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 2023-24 भविष्य निर्वाह निधीचा वार्षीक हिशोब हा त्वरीत उपलब्ध व्हावा या दृष्टीने अथक प्रयत्न करून भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत. कर्मचारी यांना एक क्लीकवर भविष्य निर्वाह निधीचा 2023-24 चा वार्षीक हिशोब पाहता येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी यांचे सन २०२3 -२4 शिल्लकेचे उतारे जि.प संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबधित कर्मचारी यांना दि.१ ऑगस्ट २०२4 पासून जिल्हा परिषदेच्या https://oftszpjalgaon.in/index.php/Home/gpfslips या संकेतस्थळावर जावून मुख्य पृष्ठावर ई-प्रशासन या सदरखाली एका क्लिकवर भ.नि.नि क्रमांकानुसार हे उतारे बघता येणार आहेत. व त्यांची प्रिंट देखील काढता येणार आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उपमुख्य व लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी दिलीप वानखेडे, सहाय्यक लेखाधिकारी किरण पाराशर , कनिष्ठ लेखाधिकारी गुलाबराव पाटील व सर्व भविष्य निर्वाह निधी शाखेतील कर्मचारी यांनी अल्प कालावधीत परिश्रम घेउन सदरचे काम पूर्ण केले आहे.
संबधित सन २०२3-२4 चे खाते उता-यांमध्ये काही दुरूस्ती आढळल्यास एक महिन्याच्या आत विभाग प्रमुखांमार्फत अर्थ विभागाच्या भविष्य निर्वाह निधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना केले आहे.