भडगाव तालुक्यातील गुढे येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुढे फाट्याजवळ एका वस्तीतील दोन झोपड्यांना आग लागून शेळ्यांचे १६ पिल्लू होरपळून ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यामुळे पशुपालकाचे नुकसान झाले असून भडगाव पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.
गुढे फाट्यावर २५ ते ३० कुटुंबांचा रहिवास आहे. मोलमजुरी करून ते उपजीविका चालवतात. त्यातील गुलाब सुखदेव भिल्ल हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. एका झोपडीत संसार तर दुसऱ्या झोपडीत शेळ्यांसाठी गोठा बनवलेला होता. त्यांच्याकडील ४० शेळ्या चरायला गेल्या होत्या. त्यांची पिल्ले मात्र गोठ्यातच होती. या आगीत ही पिल्ले होरपळून ठार झाली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने या परिवाराचे साधारण दिड लाखाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. शासनाच्या वतीने पशुपालकाला मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.