जळगाव शहरातील वाघ नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- घरात झोक्यावर बसलेले असताना तोल जाऊन खाली पडल्याने सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर सखाराम काळे (४०, रा. वाघ नगर) असे मयत सेवानिवृत्त सैनिकाचे नाव आहे. वाघ नगरमध्ये श्री दत्त मंदिरामागे राहत होते. काळे हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होते.
मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी असताना झोक्यावर बसलेले होते. त्या वेळी त्यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला.
याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.