जळगाव( प्रतिनिधी ) – झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने एका १८ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना महाबळ परिसरात मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधी पाटील ( वय – १८, रा. महाबळ, जळगाव) ही तरूणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह राहायला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तिचे आई – वडील यांचे शहरात कॉम्प्यूटर क्लासेसचा व्यवसाय आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नव्हते, झोका घेत असतांना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला. त्यावेळी घरात कुणीही नसल्याचे तिचा गळफास लागल्याने मृत्यू झाला. तिचे आजोबांना तिच्या मोबाईलवर कॉल केला परंतू कॉल उचलत नसल्याचे पाहून घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झुल्याचा गळफास लागल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळता रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. विधी ही एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.