विद्यार्थ्यांनी २६ वर्षानंतर शाळेत येऊन जागवल्या आठवणी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पुजनाने करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना पेन आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात प्राचार्य अशोक राणे यांनी माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शाळेतून आपण जे संस्कार घेऊन समाजात सन्मानाने जगत आहोत हे विद्यालयाचे ऋणानुबंध कायम जोपासा.कार्यक्रमास प्रास्ताविकात प्रणिता झांबरे यांनी माजी विद्यार्थ्यांची देश विदेशात झालेली प्रगती व आठवणींना उजाळा दिला. डी.व्ही.चौधरी व वैजयंती तळेले यांनी मनोगत व्यक्त व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती जमती किस्से सांगून आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील बाकांवर जाऊन आपल्या वर्गमित्रांसोबत शालेय जीवनाचा पुन्हा आनंद लुटत भावनिक आठवणी जागृत केल्या.