अमळनेर तालुक्यात झाडी येथे घडली होती घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात झाडी येथील दुचाकीचोरी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातीलच एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
झाडी गावचे रहिवासी महेंद्र धनसिंग पाटील यांची हिरो कंपनीची फॅशन I3s मोटरसायकल (एमएच १९ ईई ७१६५) हि दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.२० दरम्यान पुनम हॉटेल शेजारी उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा अंतर्गत दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे झाडी येथील हिरालाल छोटू पाटील यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. परी. पोलीस उप अधीक्षक केदार बारबोले यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.उ.पनि. राजू जाधव व गुन्हे शोध पथकातील पोलीस पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, गणेश पाटील, राजेंद्र देशमाने, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव,अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, उदय बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे व कॉन्स्टेबल भूषण परदेशी करत आहेत.