जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रत्येक महाविद्यालयात युवासेना व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे असे युवासेनेचे महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी यांनी आज सांगितले .
महानगरपालिका, मूळजी जेठा महाविद्यालय व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जानेवारीरोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याठिकाणी को-व्हॅक्सीन ही लस उपलब्ध राहणार आहे. शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीराच्या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी केले आहे.