• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात युवक दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात युवक दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) :- भारत राष्ट्र आपली संस्कृती व समाजाच्या उत्कर्षासाठी युवकांनी जागे व्हावे व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नये असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांची आज 12 जानेवारी रोजी जयंती.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बेसिक सायन्सेस अँड ह्यूम्यानिटीज विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, श्री संजय पाटील(स्मरणशक्तीचे अभ्यासक,वक्ते व महाराष्ट्राचे गुगल) प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख)  तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.युवक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद तसेच माता जिजाऊ यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली.

प्रथम वर्षाचे विद्यार्थी अनुष्का बऱ्हाटे, सानिका करांडे, चेतना सोनवणे, असोंदिका निकम, तेजल वराडे, चैताली मरमट, साक्षी पिसे, राजश्री पाटील, प्रणाली मुसळे, मानसी पाटील, देवेश पाटील, जिया नामदेव व प्रतीक्षा मेढे यांनी सहभाग नोंदविला. अतिशय समर्पकपणे उदाहरणांचे स्पष्टीकरण देऊन या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली. त्यांच्या मनोगतामध्ये विवेकानंद यांनी युवकांसाठी दिलेला संदेश व त्या संदेशानुसार आपण मार्गक्रमण करायला हवे हे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वराज्य मधील असलेली भूमिका याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संजय पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की दिवसेंदिवस स्मृतिभ्रंश होण्याचे प्रकार वाढत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढत आहे परंतु मोबाईल वापरामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल शक्यतो कमी वापरून जास्तीत जास्त भर पुस्तकांवर द्यावा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे योग साधना करणे आवश्यक आहे त्यामुळे एकाग्रता वाढते व कुठली गोष्ट लक्षात ठेवणे सहज शक्य होते. तसेच या प्रसंगी त्यांनी काही कविता सादर केल्यावर दिनविशेष यावरही सर्वांशी संवाद साधला.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातून शक्य आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडण व स्वराज्य निर्मितीचा पाया यामध्ये जिजाऊ मातेचे असलेले योगदान विशद केले.

मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या संभाषणामध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून व्यासपीठावर बोलण्याचा सराव होईल असे त्यांनी नमूद केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव) डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य) यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. नकुल गाडगे व प्रा. खुशाली बेलदार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचे विद्यार्थी  उत्कर्ष पाटील, नयन ललवाणी, यतीश भारंबे व काजल पाटील यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव डंपरने म्हशींना दिली जबर धडक :  ३ ठार १ जखमी

Next Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon