पाचोरा ( प्रतिनिधी ) – राज्य व केंद्रसरकार लाभ थेट गरजुंपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशिल असते, परंतु काही लाभार्थी एजंटाच्या भुलथापांना बळी पडतात. त्यामुळे एजंटापासून सावध राहून लाभार्थीनी सर्वात आधी अभ्यास करावा असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

पाचोरा शहरात प्रभागनिहाय कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. खा. उन्मेश पाटील यांनी
सांगीतले की, सरकारच्या विविध योजना आहेत लाभार्थी त्याचा विचारही करू शकत नाही. अभ्यास करून सतत मागोवा ठेऊन योजना पदरात देखील पाडून घेऊ शकत नाही.
नेमकी ही बाब भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटीचे संचालक डॉ. भुषण मगर यांनी हेरली आणि योजना, सवलती जनतेपर्यत
पोहचण्यासाठी एस. डी. एम. मल्टी सार्व्हिसेसचे संदीप महाजन यांना हे संपुर्ण पॅकेज दिले आहे.
पाऊस सकाळपासुन सुरु असतांना देखील या मंगल कार्यालयाची जागा गरजु जनतेच्या उपस्थीतीमुळे पूर्ण पॅक झाली होती काही नागरीकांना बसण्यासाठी जागा नसल्याने निम्यापेक्षा जास्त नागरिक घरी गेलेत त्याचीही दखल आयोजकांनी घ्यावी अशी सूचना करण्यात येत होती .
आयोजक अमोल शिंदे आणि डॉ. भुषण मगर , प्रकल्प प्रमुख , ध्येय अँकेडमी आणि एस. डी. एम. मल्टी सर्व्हीसेसचे संचालक, ध्येय न्युजचे संपादक यांचे कौतुक यावेळी लोकांनी केले . खा. उन्मेश पाटील यांच्या सुचनेला आदेश मानत असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.
आता पुन्हा प्रत्येक श्रमिक माता-पिता, बंधु-भगिनींन पर्यंत योजना व माहिती पोहण्यासाठी प्रकल्प प्रमुख संदीप महाजन पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभागात भा. ज. पा. तालुका प्रमुख अमोल शिंदे (शिंदे ॲकेडमी) आणि डॉ. भुषण मगर यांच्या प्रमुख उपस्थीत कॉर्नर मिटींगचे आयोजन करणार आहे पाचोरा-भडगाव शहराच्या प्रत्येक घरा – घरात व शहरानंतर असाच उपक्रम ग्रामीण भागासाठी देखील राबववुन प्रत्येक घरात व व्यक्ती पर्यंत योजना पोहचण्यासाठी प्रयत्नशिल आहोत असे आयोजकांनी सांगितले .
डॉ. भुषण मगर यांनी सांगितले की , शासन समाजातील ९५ टक्के घटकांना आजारावर ५ लाखा पर्यंत विविध योजनेखाली विनामुल्य मदत करते
त्या सर्व सुविधा विघ्नहर्ती मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध आहेत परंतु अपुर्ण माहिती व कागदपत्रांमुळे नागरीक योजनांचा लाभ न
घेता विनाकारणा भुर्दड सोसतात यासाठी सर्व कागदपत्रे पुर्तता करून ठेवणे आवश्यक आहे.







