रावेर/भडगांव (प्रतिनिधी) ;- यशस्विनी सामाजिक अभियान प्रमुख़ महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांना सावित्रीआई फुले महिला शिक्षक दिना निमित्त फातेमाबी शेख आदर्श महिला पुरस्काराने त्यांच्या सामाजिक,राजकीय,क्षैक्षणिक,
धार्मिक,क्रिडा,महिला सबलीकरण, कोरोना काळात केलेले निस्वार्थ जनसेवाकार्य तसेच विविध क्षेत्रातील विकासात्मक योगदानाची दख़ल घेत भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी,जळगांव जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील,खासदार रक्षाताई खडसे यांचे हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद रावेर येथे पुरस्कार ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 15 महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.दरम्यान रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ति झाल्याबद्दल नगरसेविका योजना पाटील,राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी व्ही.एस.पाटील,मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छया दिल्या.सदर प्रसंगी आयोजन समिती सह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








